पुणे: प्रवासादरम्यान महिलेकडील ५ लाखांचा ऐवज चोरीला

पुणे, दि. २७/०७/२०२२ -रेल्वे प्रवासानंतर पुणे स्टेशन परिसरात विश्रांती घेउन घरी गेल्यानंतर पिशवीतून ५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे महिलेला लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात धाव घेउन तक्रार दिली आहे. ही घटना २ जूनला मीडिया पार्वâ सोसायटी ते बी.टी.कवडे रस्ता परिसरात घडली.

फिर्यादी महिला मूळची जळगावमधील चाळीसगावची आहे. २ जुनला त्या रेल्वेने प्रवास करून पुणे स्टेशन परिसरात आल्या होत्या. त्यानंतर मीडिया पार्वâ सोसायटी ते बी.टी.कवडे रस्ता प्रवास करीत त्या मुलाच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांना पिशवीतील रोकड आणि दागिने असा ५ लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक पी.एस. माने तपास करीत आहेत.