पुणे: पीपी बालकृष्णा हेगडे करंडक टेबल टेनिस स्पर्धेत 80 खेळाडूंचा सहभाग

पुणे, 2 डिसेंबर 2022: रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) यांच्या वतीने आयोजित पीपी बालकृष्णा हेगडे करंडक टेबल टेनिस स्पर्धेत पुना क्लब व आरसीबीसी या दोन्ही  क्लबमधील 80 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे.  ही स्पर्धा 3 व 4 डिसेंबर 2022 या कालावधीत रॉयल कॅनॉट बोट क्लब(आरसीबीसी) टेबल टेनिस पोचा हॉलमध्ये  होणार आहे. 
 
तसेच, हि स्पर्धा 15 वर्षाखालील, 15 ते 50 वयोगटातील व 60 वर्षावरील गटात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन पॅरा टेबल टेनिस खेळाडू सुमित सेहगल,रॉयल कॅनॉट बोट क्लबचे(आरसीबीसी) अध्यक्ष अरूण कुदळे आणि पुना क्लबचे अध्यक्ष सुनील हांडा यांच्या हस्ते  होणारअसल्याची माहिती आरसीबीसीचे स्पोर्ट्स चेअरमन समीर सावला यांनी दिली.