पुणे, १ डिसेंबर २०२५: पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकतीचा पाऊस पडला आहे. १२ दिवसांत ९ हजार ३७० हरकतीहरकती आल्या आहेत. त्यात सर्वाधिक म्हणजे ३ हजार ६४० हरकती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करण्यात आली. या निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ३५ लाख ५१ हजार ४६९ आहे. त्यात दुबार मतदारांची नावे तब्बल तीन लाख ४४६ आहेत. पालिकेच्या ४१ पैकी १० प्रभागांमध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. या प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडत आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सशुल्क विकत मिळत आहे. गेल्या १२दिवसांत प्रारूप मतदार यादीच्या विक्रीतून १६ लाख ०६ हजार ३३३रुपये मिळाले आहेत.

More Stories
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन
Pune: केदारनाथ पुरातील मृत घोषित झालेला शिवम पुण्यात सापडला; प्रादेशिक मनोरुग्णालयात कौटुंबिक पुनर्वसन