पुणे, ०९/११/२०२२: प्रेमप्रकरणाच्या वादातून पुण्यातील औंध परिसरात एका तरुणीचा बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर वार करुन तिला गंभीर जखमी करत तिचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली अाहे. श्वेता रानवडे (वय-२२,रा.औंध,पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव अाहे.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता रानवडे ही तरुणी औंध परिसरात सिध्दार्थनगर भागात राहण्यास आहे. प्रेमप्रकरणाच्या कारणावरुन तिचे एका तरुणाशी बुधवारी दुपारी वाद झाले. त्यानंतर संबंधित तरुणाने त्याच्या जवळील धारदार शस्त्र काढून थेट तरुणीवर जीवघेणा हल्ला करत वार केले. संबंधित तरुणीवर त्याने वार केल्यानंतर ताे पसार झाला. मात्र, या घटनेत रक्ताच्या थाराेळयात पडलेल्या तरुणीला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु डाॅक्टरांनी तिचा उपचारापूर्वीच मृत्यु झाल्याचे घाेषित केले. पसार झालेल्या हल्लाखाेर आरोपी तरुणाचा पाेलीस शाेध घेत आहे. याबाबत पुढील तपास चतुश्रृंगी पाेलीस करत आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा