पुणे: दहा रूपये देत, ७० वर्षीय नराधमाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे, ८ जून २०२१ – शहरातील एका ७० वर्षाच्या नराधमाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोंढवा सासवड रोड परिसरात सोमवारी घडला आहे. याप्रकरणी एका ३७ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला कुटूंबियासह कोंढवा सासवड रस्त्यावरील एका इमारतीत राहायला आहे. काल सकाळी महिला आणि त्यांचे पती घरी नसताना ७० वर्षीय आरोपी त्यांच्या घरी गेला. त्याने अल्पवयीन मुलीला १० रूपये देऊन अत्याचार केला. यापूर्वीही त्याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला आहे.