पुणे: विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग, हडपसर भागातील शाळेतील घटना

पणे,०९/०८/२०२२: हडपसर भागातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात लावलेल्या बसने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात घबराट उडाली.

 

हडपसर भागातील एंजल मिकी मिनी स्कुलच्या आवारात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला अचानक आग लागली. बसमध्ये विद्यार्थी नसल्याने अनर्थ टळला.

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काळेपडळ अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड, जवान सरोदे, चौधरी, दडस, कोंडगेकर, बिचकुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही. गेल्या महिन्यात कात्रज-कोंढवा रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागली होती. बसच्या अंतर्गत भागात शाॅर्ट सर्किंट होऊन आग लागण्याच्या घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.