पुणे: संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

पुणे,२९ मे २०२१: संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी पुण्यात एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संविधानाचा अवमान व सामाजिक संतुलन बिघडविण्याच्या हेतूने इन्स्टाग्राम वरुन लाईव्ह संभाषण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे बाळु मोहन शेंडगे (वय 39, रा. पिंपळे सौदागर, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात आज (शुक्रवारी) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय म्हसे (रा. पवार नगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय याने इन्स्टाग्राम अकाउंट वरुन मित्रांसोबत संविधानाचा अवमान करणारे लाईव्ह संभाषण केलं. या संभाषणात सामाजिक संतुलन बिघडण्याचा मानस असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.