पुणे: अश्लील वक्तव्य करून अश्लील हातवारे केल्याने तिघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे, दि.२७/०९/२०२२: पुण्यातील वाघाेली परिसरात राहणारी ३० वर्षीय तरुणी ही तिच्या मित्रासाेबत बीएमडब्लूय कार मध्ये जेवण करण्यासाठी गेली असताना, हाॅटेलच्या जवळ रस्त्यावर थांबलेल्या एका टाेळक्याने संबंधित तरुणीला पाहून अश्लील वक्तव्य करून अश्लील हातवारे केल्याचे समोर आले आहे. याबाबत सदर तरुणी व तिचा मित्र टाेळक्यास जाब विचारण्यासाठी गेले असता टाेळक्याने त्यांना मारहाण करुन बीएमडब्लयू कारची ताेडफाेड करून नुकसान केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीने विमानतळ पाेलीस ठाण्यात आराेपी विराेधात पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहेन श्रीकांत सुर्यवंशी (२०),रा. येरवडा, पुणे, यश विजय शिंदे (२०), रा. येरवडा या आराेपींना पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह एका १७ वर्षीय मुलावर देखील पाेलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित तरुणी ही २५ सप्टेंबर राेजी रात्री ११.०० विमाननगर येथील सीसीडी चाैका जवळ एका हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली हाेती. सदर ठिकाणी रस्त्यावर थांबलेल्या सदर आराेपींपैकी एकाने तिला अश्लील बाेलुन अश्लील हातवारे केले. त्यामुळे त्याबाबत तिचा मित्र जाब विचारण्यासाठी सदर टाेळक्याकडे गेला असता त्यास आराेपींनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन बीअरची बाटली फेकून मारली असल्याचे समोर आले आहे.
या मारहाणीत संबंधित तक्रारदार तरुणी व तिचा मित्र या दाेघांची साेन्याची चैन पडून घाळ झाली आहे. तसेच आराेपींनी यावेळी बीएमडब्लयू कारच्या काचा फाेडून नुकसान केले असल्याचे देखील समोर आले आहे. याबाबत पुढील तपास विमानतळ पाेलीस करत आहे.