पुणे: प्रभाग रचनेसाठी समिती तयार करणार, आयुक्तांनी बोलविली बैठक

पुणे, २६/०८/२०२१: राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा नुसार पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकसदस्यीय प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासदर्भात उदया आयुक्तांनी बैठक बोलविली आहे. या बैठकीत  समिती  स्थापन करण्याचा निर्णय आयुक्त घेण्याची शक्यता आहे.

आगामी पालिका निवडणुकीसाठी २०११च्या लोकसंख्येनुसार प्रभागरचना तयार केली जाणार आहे. २०११च्या लोकसंख्येनुसार पुणे शहर आणि समाविष्ट झालेल्या गावाची लोकसंख्या सुमारे ३५ लाखाच्या आसपास  आहे. त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनूसूचित जमातीच्या लोकसंख्येनुसार प्रभाग आरक्षित करण्यात येणार आहे.  पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी   आयुक्तांनी उदया बैठक बोलविली आहे. या बैठकीत  समिती  स्थापन करण्याचा निर्णय आयुक्त घेण्याची शक्यता आहे.

 एक सदस्यीय प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपुर्ण माहिती असलेला अधिकारी , प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी , नगररचनाकार, संगणक तज्ञ  तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकारी यांची पालिका आयुक्तांनी समिती गठित करायची आहे.