पुणे: एमआयडीसीतील उरवडे गावातील सॅनिटायझर कंपनीत लागलेल्या भीषण आग, १८ जणांचा होरपळून मृत्यू

पुणे, ७/०६/२०२१: सॅनिटायझर बनविणाऱ्या एसव्हीएस अ‍ॅक्वा टॅकनोलॉजिस कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत किमान १८ कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावातील कंपनीत आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमक दलाला यश आले आहे. अद्यापही काही बेपत्ता झालेल्या कामगारांची शोधमोहिम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची भीती प्रशासनाने दिली आहे. कामगारांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांसह कुटूंबियावर शोककळा पसरली आहे.

मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावात एसव्हीएस अ‍ॅक्वा टेकनोलॉजिस कंपनी आहे. संबंधित वंâपनीत सॅनिटायझरसह विविध उत्पादने घेतली जातात. सोमवारी ४० ते ५० कर्मचारी कंपनीत काम करीत होते. त्यावेळी शॉटसर्किटमुळे एका विभागात अचानक आग लागली. सॅनिटायझरमुळे आग वेगाने पसरल्यामुळे ३७ कामगार अडकले होते. त्यानंतर एमआयडीसी आणि पीएमआरडीए अग्निशमक दलाच्या ९ गाड्या आणि ११ रूग्णवाहिका घटनास्थळी धाव घेउन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, प्रचंड धुराच्या लोटामुळे आग विझविण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आग विझवून बेपत्ता कामगारांची रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम सुरू ठेवली होती.

रात्री आठवाजेपर्यंत १८ कामगारांचे मृतदेह आढळून आले.शॉर्टसर्किटटमुळे कंपनीत भीषण आगीत होरपळून कामगारांचा अक्षरशः कोळसा झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यात प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते. दरम्यान, आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संग्राम शिर्के यांनी दिली आहे.

आगीत अडकलेल्या कामगारांची नावे

अर्चना कवडे, सचिन घोडके, संगीता गोंडे, मंगल मोरगळे, सुरेखा ताप, सुमन ढेबे, सुनीता साठे, संगीता पोलेकर, माधुरी अंबरे, मंदा कुलत, त्रिशला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुदळे, धनश्री शेलार

आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत: उपमुख्यमंत्री अजित पवार  

“पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे. अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल,” अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

मुळशी दुर्घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आग विझली असली तरी कुलींग ऑपरेशन सुरु आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आगीचं प्राथमिक कारण कळू शकेल. मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्या चौकशीतून आगीची नेमकी कारणे कळतील व दुर्घटनेची जबाबदारी निश्चित करता येईल. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल व स्थानिक प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं होतं. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख, पीएमआरडीए आयुक्तांकडून यासंदर्भत अधिकची माहिती घेतल्यानंतर त्यांनाही तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करुन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आगीची चौकशी होईल. पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला आहे. सद्यस्थितीत आग पूर्णपणे विझवणे आणि जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात दिलं जात आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील,” अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

आगीतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती