पुणे: पावसाचे पाणी अंगावर उडविल्याने महिलेकडून कारचालकास मारहाण

पुणे, १६/०८/२०२२:

महिला रस्त्याने दुचाकीवर जात असताना कारचालकाच्या गाडीमुळे रस्त्यावरील पावसाचे पाणी तिच्या अंगावर उडाल्याचा प्रकार घडला. याप्रकारामुळे चिडलेल्या महिलेने कारचालकास थांबवून त्याला जाब विचारत रस्त्यावर पडलेला दगड डाेक्यात मारुन जखमी केले.

 

महिले विराेधात मुंढवा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रेणुका नितीन पुडे (वय-३५,रा.येरवडा,पुणे) गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. याबाबत निशांत भागीरथ मल्हाेत्रा (वय-४५,रा.काेरेगाव पार्क,पुणे) यांनी तक्रार दिली. ही घटना १५ अाॅगस्ट राेजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला असून साेमवारी रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

 

 

निशांत मल्हाेत्रा हे साेमवारी दुपारी त्यांची कार घेऊन ताडीगुत्ता चाैकातून एबीसी राेडने राहत्या घरी काेरेगाव पार्कच्या दिशेने जात हाेते. हायस्पिरीट हाॅटेलच्या समाेरील रस्त्यावर सिग्नलला त्यांच्या गाडीमुळे पावसाचे पाणी हे दुचाकीवरील रेणुका पुडे यांच्या अंगावर चुकुन उडले गेले. मात्र, याकारणावरुन सदर ठिकाणी रेणुका पुंडे यांनी त्यांच्या दुचाकीवरुन मल्हाेत्रा यांच्या गाडीचे काचेवर झाडुने मारुन त्यांना बळजबरीने खाली उतरवले.त्यानंतर त्यांनी तिला जाब विचारताना बाजुला सारल्याने ती खाली पडल्याचे कारणावरुन अाराेपी महिलेने रस्त्यावर पडलेला दगड मल्हाेत्रा यांचे डाेक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले अाहे. याबाबत मुंढवा पाेलीस पुढील तपास करत अाहे.