पुणे, ०१/०१/२०२२: महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मु पो. मेढा, जावळी, सातारा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडीत महिलेशी आरोपी पवार याची जानेवारी २०१९ मध्ये ओळख झाली होती. आरोपी पवारने महिलेला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. तिच्याकडून वेळोवेळी आठ लाख ६८ हजार रुपये पवारने उकळले.
त्यानंतर पवारने महिलेवर बलात्कार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करत आहेत.
महापालिकेत नोकरीच्या आमिषाने महिलेवर बलात्कार तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी संतोष पवार याच्या विरोधात यापूर्वी अशाच प्रकारचा एक गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याने एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला होता. सदनिका खरेदी करुन देण्याच्या बतावणीने त्याने तिच्याकडून लाखो रुपये उकळले होते.
More Stories
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत तात्जाना मारिया व निगिना अब्दुरैमोवा यांच्यात अंतिम लढत