September 23, 2025

पुणे: मांजरी बुद्रूक परिसरात तरूणाचा मोबाइल हिसकाविला

पुणे, दि. २०/०९/२०२३: मोबाइलमध्ये व्हिडिओ पाहत बसलेल्या तरूणाच्या हातातील ५० हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना १४ सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरातील ओव्हर ब्रीजजवळ घडली. याप्रकरणी तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूण १४ सप्टेंबरला रात्री सव्वा दहाच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरात मोबाइल पाहत बसला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघा चोरट्यांनी तरूणाच्या हातातील ५० हजारांचा मोबाइल हिसकावून पोबरा केला. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलीस उपनिरीक्षक ए.आर. गांधले तपास करीत आहेत.