पुणे: महापालिका भवन परिसरात तरुणावर शस्त्राने वार करुन लुटले

पुणे, १९/११/२०२२: महापालिका भवन परिसरात तरुणावर शस्त्राने वार करुन त्याच्याकडील १८ हजारांची रोकड लुटण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.

अक्षय गणेश शिंदे (वय २३,रा. महादेव मंदिराजवळ, डेक्कन जिमखाना) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. राम खटका (वय २३, रा. चतु:शृंगी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. खटका याने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिंदे आणि त्याचा मित्र महापालिका भवन परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपी अक्षय शिंदे आणि साथीदार तेथे आले. खटका याच्या हातावर शस्त्राने वार करुन चोरट्यांनी खिशातील १८ हजार रुपये, डेबिट कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड असा मुद्देमाल हिसकावून घेतला.

शिंदे आणि साथीदार पसार तेथून पसार झाला. खटका याने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदाराचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.