पुणे : आठ हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला एसीबीने रंगेहात पकडले

पुणे,दि.१६ जून २०२१: – जागेचा उतारा देण्यासाठी आणि सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी ८ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वेल्हा तालुक्यातील कोदवडी गावच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) रंगेहात पकडले आहे. मुकुंद त्रिंबकराव चिरटे (वय ३४, रा. नसरापूर ता. भोर, तलाठी कोदवडी वेल्हा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांच्या संस्थेनी २० गुंठे जागा दामगुड आसनी, वेल्हा येथे विकत घेतली आहे. खरेदी करण्यापूर्वी संबंधीत जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताNयावर नोंद घेण्यासाठी तलाठी चिरटे याने १० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रादाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा केली असता, तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार एसीबीने सापळा रचून ८ हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात पकडले.