पुणे: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आरोपीने घातला राडा हडपसरमधील साडेसतरा नळी परिसरातील घटना

पुणे, 08 नोव्हेंबर 2022 – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने तरूणाला धमकावून त्याला ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना ७ नोव्हेंबरला दुपारी चारच्या सुमारास हडपसरमधील साडेसतरानळी परिसरात घडली.

याप्रकरणी बापू मकवाना (रा. हडपसर) याच्याविरूद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अक्षय भोसले (वय २७ रा. हडपसर) यांनी तक्रार दिली आहे.

फिर्यादी अक्षय आणि त्यांचा मित्र कृष्णा, भाउ जाधव गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आलेल्या बापूने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने अक्षयला शिवीगाळ करून मी इथला भाई आहे, असे धमकावून अंगावर धावून गेला. बाचाबाची वाढल्यामुळे कृष्णा, भाउ यांनी बापूला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने कोयता उगारून दहशत निर्माण केली. त्यामुळे आजूबाजूचे लोक भीतीने सैरावैरा पळून गेले. आरोपीने परिसरात दहशत निर्माण करून आरडओरड केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सी.सी. थोरबोले तपास करीत आहेत.