पुणे: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीची आत्महत्या, मुळशीतील घटना

पुणे, १०/११/२०२२: एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून करुन पसार झालेल्या आरोपी तरुणाने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्रतीक ढमाले असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. श्वेता रानवडे असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. बुधवारी दुपारी रानवडे आणि तिची बहीण औंध भागातून निघाली होती. त्यावेळी दबा धरून बसलेल्या प्रतीकने तिच्यावर चाकूने वार केले होते. या घटनेनंतर घबराट उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्रतीकच्या मागावर पोलिसांची पथके होती. गुरवारी सकाळी प्रतीकने मुळशी तालुक्यातील टाटा धरणाजवळ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आले.