September 20, 2025

Pune: धनकवडी-सहकारनगरमध्ये अतिक्रमणाविरुद्ध कारवाई, ७२०० चौरस फुटावरीव बांधकाम पाडले

पुणे, दि. १७ सप्टेंबर २०२५ : धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील दत्तनगर ते जांभूळवाडी व दत्तनगर ते आंबेगाव या परिसरात पदपथ, इमारत फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत बांधकामाविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. नागरिकांच्या वारंवार तक्रारी व वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बांधकाम विकास विभाग (झोन २) व अतिक्रमण विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली.

ही कारवाई उपआयुक्त अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग संदीप खलाटे, उपआयुक्त परिमंडळ क्र. ३ विजयकुमार थोरात व महापालिका सहाय्यक आयुक्त सुरेखा भनगे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. कनिष्ठ अभियंता मोहन चव्हाण, अतिक्रमण निरीक्षक सागर विभूते, सहाय्यक निरीक्षक हनमंत काटकर, प्रथमेश पाटील, किरण नवले, अतुल ब्राम्हणकार, विनोद दुधे, प्रशांत कोळेकर, दिनेश नवाळे यांच्यासह ३ पोलीस, ४ महाराष्ट्र सुरक्षा बल व १९ बिगारी सेवक उपस्थित होते.

कारवाईत एकूण ७२०० चौ.फूट कच्चे-पक्के बांधकाम मोकळे करण्यात आले. याशिवाय १ हातगाडी, ५ लो काउंटर, १ स्टील काउंटर, ५ पथाऱ्या, १ फ्रीज, १० इतर वस्तू व ११ झोपड्या हटवून तब्बल ५ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. महापालिकेने अशी कारवाई पुढेही मोठ्या प्रमाणावर सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले.