पुणे: कोरेगावपार्कमधील हॉटेल रोव्ह (प्लन्ज)वर कारवाई

पुणे, दि. ०५/०९/२०२२ – कोरेगाव पार्कमध्ये पहाटे पाचपर्यंत सुरू असलेल्या हॉटेल रोव्ह (प्लन्ज)विरूद्ध सामाजिक सुरक्षा विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. दोन्ही पथकाकडून सुंयक्तरित्या ५ सप्टेंबरला पेट्रोलिंग करण्यात आले. त्यावेळी रात्री उशिरापर्यंत हॉटेल रोव्ह प्लन्ज सुरू असल्याचे आढळून आले. त्यानुसार हॉटेलविरूद्ध कारवाई करण्यात आली.

 

कोरेगाव पार्कमध्ये रात्री उशिरापर्यंत हॉटेल रोव्ह (प्लन्ज) सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा पथकासह राज्य उत्पादन शुल्क पथकाने संयुक्तपणे पाहणी केली असता हॉटेल रोव्ह (प्लन्ज) पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार दुय्यम निरीक्षक विरेंद्रसिंह व चौधरी यांनी संयुक्त रिपोर्टसह पंचनामा करुन कारवाई केली . ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त श्री रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, अजय राणे, मनिषा पुकाळे, प्रमोद मोहिते, पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली.