पुणे, ४/०६/२०२१: कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरातील हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा परिसर दुसऱ्या लाटेत मात्र, एकदम सुरक्षीत भाग राहिला आहे. आज (शुक्रवारी) फक्त एक कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे. सर्वाधिक ६० रुग्ण हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सापडले आहेत. सरासरी बाधितांचा दर ५.५ टक्के इतका खाली आला आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या ५०० पेक्षा कमी झाली आहे.
शुक्रवारी शहरात ३४९ रुग्ण आढळले, त्याचा क्षेत्रीय कार्यालय निहाय बाधित रुग्णांचा आढावा घेतल्यास त्यामध्ये सर्वात कमी रुग्ण भवानी पेक्षा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत एक तर कसबा कार्यालयाच्यामध्ये केवळ ७ रुग्ण आढळले आहेत.
शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालय १३, ढोले पाटील रस्ता २०, येरवडा १६, नगर रोड २७, वानवडी-रामटेकडी १४, बिबवेवाडी १५, धनकवडी ४०, सिंहगड रस्ता ३६, वारजे-कर्वेनगर २७, कोथरूड ३५, औंध २४, कोंढवा येवलेवाडी १४ आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सर्वाधिक ६० रुग्ण आढळून आले आहेत.
बाधितांचे प्रमाण फक्त ५.५ टक्के
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोरोना बाधितांचे प्रमाण १९.७७ टक्के इतके होते. आता जूनच्या पहिल्या आठवड्यात हेच प्रमाण ५.५ टक्के इतके कमी झाले आहे.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद