पुणे, ४/२/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत अखिल भारतीय अंतरविद्यापीठ महिला हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत संपूर्ण भारतातून झोनल मधून अंतिम १६ संघ राष्ट्रीय स्तरावर पोहचले होते. या १६ संघातून आज तिसरे स्थान प्राप्त करण्यासाठी संबलपूर विद्यापीठ आणि पंजाबी विद्यापीठ पटियाला या दोन संघात लढत झाली. यामध्ये पंजाबी विद्यापीठ पटियाला संघाने संबलपूर विद्यापीठाचा २-१ असा पराभव केला. या स्पर्धेतील अंतिम सामना रांची विद्यापीठ विरुद्ध आरटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर यांच्यात झाला. प्रचंड उत्साह आणि अटीतटीच्या या सामन्यात आरटीएम विद्यापीठ ग्वाल्हेर ने २-१ असा रांची विद्यापीठाचा पराभव केला.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड, रमेश अवस्थे, अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून निरीक्षक म्हणून आलेले डॉ.सिंग, अर्जुन पुरस्कार प्राप्त रेखा भिडे, ऑलम्पियर विक्रम पिल्ले, अजित लाकरा, महाराष्ट्र हॉकी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, माजी संचालक डॉ.दिपक माने, विद्यमान संचालक विष्णू पेटकर, सहायक क्रीडा संचालक दत्ता महादम, प्राचार्य डॉ.संजय चाकणे, महाविद्यालयाचे शारीरिक क्रीडा संचालक डॉ. महेश बेंडभर आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर म्हणून रांची विद्यापीठाची प्रिया कुमारी, उत्कृष्ट अटॅकर पटियाला विद्यापीठाची आरती, उत्कृष्ट डिफेंडर आयटीएम विद्यापीठाची संस्कृती, उत्कृष्ट मिडफिल्डर संबलपूर विद्यापीठाची सुजाता आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान प्रियंका यादव यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, आमचे महाविद्यालय हे हॉकीची पंढरी म्हणून ओळखली जाते. ऑल इंडिया विद्यापीठ संघाने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आमच्यावर ही जबाबदारी टाकली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. विद्यार्थ्यांनी असेच कष्ट करून आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगभर करावे. यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालनअविनाश कोल्हे तर आभार बेंडभर यांनी मानले
More Stories
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत ब्लेझिंग ग्रिफिन्स संघाला विजेतेपद
संयम राखायला शिका – भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयचा नवोदितांना सल्ला
अकराव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, फाल्कन्स ऑप्टिमा, सनबर्ड्स, स्पिअर्स संघांचे विजय