पुणे, १ जुलै २०२५: स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे अजेय योद्धा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवार, 4 जुलै रोजी होणार आहे. खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरात हा ऐतिहासिक पुतळा उभारण्यात आला आहे.
हा पुतळा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे उभारण्यात आला असून, अनावरण सोहळा सकाळी 10:45 वाजता पार पडणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिटी ग्रुपचे संचालक अनिरुद्ध देशपांडे, बाजीराव पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा, तसेच एनडीएचे कमांडंट ॲडमिरल गुरचरण सिंह हे उपस्थित राहणार आहेत.
अजेय योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मृती जपण्यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून, प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले आणि सचिव कुंदनकुमार साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला आहे. पुतळा उभारणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकारामुळे अमित शहा यांचे सहकार्य मिळाले. सिटी ग्रुपचे अनिरुद्ध देशपांडे यांनीही आर्थिक आणि तांत्रिक मदत केली.
साडेतेरा फुट उंच आणि चार हजार किलो ब्राँझचा वापर करून शिल्पकार विपुल खटावकर यांनी हा पुतळा साकारला आहे.
केवळ 40 वर्षांचे आयुष्य लाभले असतानाही बाजीराव पेशवे यांनी लढलेली सर्व युद्धे जिंकली होती. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा भव्य पुतळा एनडीएतील प्रशिक्षणार्थींना सदैव प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि सचिवांनी व्यक्त केला आहे.
More Stories
Pune: पहिला ‘खासदार क्रीडा महोत्सव’ रंगणार २ ते १६ नोव्हेंबरदरम्यान
Pune: जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीला जैन समाजाचा विरोध
Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ब्ल्यू एनर्जी मोटर्स ईव्ही ट्रकचा शुभारंभ