पुणे, दि. ०६/११/२०२२ – रिक्षाचालकाचा पाठलाग करून सिग्नलवर थांबले असता त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करीत चाकूने वार केल्याची घटना २ नोव्हेंबरला येरवड्यातील शास्त्रीनगरमध्ये घडली.
अक्षय ईश्वर चव्हाण (वय २८, रा. गांधीनगर, येरवडा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय रिक्षाचालक असून २ नोव्हेंबरला रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रवाशी घेउन चालले होते. त्यावेळी शास्त्रीनगर चौकात दुचाकीस्वार चोरट्याने त्यांचा मोबाइल चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षयने चोरट्यांना विरोध करीत जाब विचारला. त्यावेळी त्यांनी चाकूने वार करून अक्षयला जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राहूल डोंबाळे तपास करीत आहेत.
More Stories
22व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 40000 डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत जर्मनीच्या तात्जाना मारिया हिला विजेतेपद
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश