येरवडा, १२/११/२०२२: पूर्वैमनस्यातून पुण्यात दुहेरी खुनाची घटना शनिवारी मध्यरात्री घडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येरवडा परिसरातील शंकर चव्हाण यांच्यावर केलेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी ८ ते १० जणांच्या टोळ्याने दोघा सराईत गुन्हेगारांवर धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्यांचा निर्घुण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
अनिल ऊर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष ऊर्फ किसन राठोड अशी खून झालेल्या इसमांची नावे आहेत. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील पांडु लमाण वस्तीतील नगरसेविका श्वेता चव्हाण यांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी पहाटे तीन वाजता घडली आहे. याप्रकरणी सुभाष राठोड यांचा भाऊ लक्ष्मण राठोड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुभाष राठोड याने २००८ -०९ च्या दरम्यान शंकर चव्हाण यांच्यावर फायरिंग केले होते. त्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगून राठोड बाहेर आला होता. मात्र, टोळीतील वाद सुरू होते. अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड व आणखी एक त्यांचा साथीदार शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरुन येरवडा परिसरातून जात होते. त्यावेळी ८ ते १० जणांच्या टोळक्याने त्यांना वाटेत अडविले.त्यांच्यावर सपासप वार करुन त्यांचा निर्घुण खून केला. त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार हा पळून गेल्याने बचावला गेला आहे.
ही घटना समजल्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सदर दोन्ही खून झालेले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय मध्ये पाठवले. याप्रकरणी आरोपींवर येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा