पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सुधारित नियमावली जाहीर, किराणा, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक गोष्टींची दुकानांची वेळ कमी , घरपोच सुविधा सहा वाजेपर्यंतच

पुणे, दि. 21 एप्रिल 2021: : राज्यशासनाच्या अतिरिक्त सूचनेनुसार, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे नुकतेच सुधारीत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळ कमी करण्यात आली आहे तसेच घरपोच सेवा सुविधा ही केवळ सहवाजेपर्यंतच चालू राहणार आहे.

सुधारीत आदेशानुसार,मेडिकल वगळता इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेत खुली राहतील. त्यामध्ये
सर्व किराणा, खाद्यपदार्थ ( चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी विक्री करणारी दुकाने समाविष्ट), शेतीविषयक वस्तूं आणि शेतमालाची विक्री करणारी दुकाने, पाळीव प्राण्याचे खाद्यपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्यनिर्मिती आणि विक्री करणारी दुकाने यांचा समावेश आहे.

तर या दुकानातून वस्तूंची घरपोच सुविधा देणारी सेवा सोमवार ते शुक्रवार या कालावधीत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील, असेही नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे.