पुणे, २४ जुलै २०२५: मैत्री सेल उद्योग विभागाअंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्याबाबत १८००२३३२०३३ टोल फ्री क्रमांकावर मार्गदर्शन करण्यात येणार असून अधिकाधिक उद्योजकांनी उद्योगासंदर्भात या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अर्चना कोठारी यांनी केले आहे.
या टोलफ्री क्रमाकांसोबतच कार्यालयीन ०२२- २२६२२३२२, २२६२२३६१ दुरध्वनी क्रमांकवरही मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. यामध्ये नवउद्योजकांना उद्योग सुरु करण्याकरिता लागणाऱ्या अनुज्ञाप्ती, परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, उद्योगधंद्यासंदर्भात शासनाशी निगडित येणाऱ्या अडीअडचणी व त्यावर उपायायोजना, विविध उत्पादनांचे विदेशामध्ये निर्यात करणे, निर्यातीकरिता शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, असेही श्रीमती कोठारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
More Stories
Pune: बाराशे खड्डे बुजवूनही अनेक ठिकाणी खड्डे
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ४१८६ घरांच्या ऑनलाईन सोडतीचा शुभारंभ
“एकीकडे खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही म्हणायचं, आणि दुसरीकडे पाकिस्तानसोबत क्रिकेट?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल