पुणे: अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे, 20 जानेवारी 2023: पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी व मोटार वाहन कायद्यातील इतर गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या ५७ वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. मोटार वाहन कर व दंड न भरल्यास या वाहनांचा जाहिर लिलाव करुन कराची वसुली करण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.