पुणे, ३१/१०/२०२२- वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी वास्तूशास्त्र सल्लागाराच्या खून प्रकरणाचा छडा लावला असून दोघांना अटक केली आहे. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात भरुन नीरा नदीत टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
निलेश वरघडे (वय ४३, रा. सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचे नाव आहे. या प्रकरणी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे (रा. नऱ्हे, आंबेगाव), साथीदार रणजीत ज्ञानदेव जगदाळे (वय २९) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रुपाली रुपेश वरघडे (वय ४०) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
निलेश वरघडे वास्तूशास्त्र सल्लागार होते. आरोपी निलेश यांच्या परिचयाचे होते. नऱ्हे भागातील एका ओैषध दुकानात पूजेसाठी आरोपी नरळे आणि जगदाळे निलेश यांना घेऊन गेले होते. निलेश यांना काॅफीतून गुंगीचे ओैषध दिले. बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरुन नीरा नदीत टाकून देऊन आरोपी पसार झाले.
निलेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार नरळेला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीत पोलिसांना तो वेगवेगळी माहिती देऊन दिशाभूल करत होता. पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी नरळे आणि जगदाळे यांनी खून केल्याची कबुली दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोप आढळून आले आहेत. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे आदींनी तपास करुन गुन्हा उघडकीस आणला.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा