पुणे, २६/०८/२०२१: शहरातील वाघोली परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्याच्याकडून २ लाख ६३ हजारांचा १३ किलो ३०० ग्रॅम गांजा दुचाकी आणि मोबाईल असा ३ लाख २८ हजारांचाऐवज जप्त करण्यात आला. नितीन मोहन डुकळे (वय २५ रा. वाघेश्वरनगर,वाघोली ) असे अटक वे केलेल्याचे नाव आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक एक लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी वाघेश्वरनगर येथील कचरा डेपो समोरील रोडवर एकजण दुचाकी वाहनासह संशयितस्पदरित्या मिळुन आला. त्यामुळे पथकाने नितीनला ताब्यात घेउन झडती घेतली. त्याच्याकडील नायलॉनचे पोत्यामध्ये १३ किलो ३०० ग्रॅम गांजा दुचाकी आणि मोबाईल असा ३ लाख २८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
त्याच्याविरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्र देशमुख, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, मनोज साळुके, राहुल जोशी, मारुती पारधी, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, नितेश जाधव,योगेश मोहिते यांनी केली आहे.
More Stories
पुणे: पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
चित्रपटाचे एडिटिंग ही अदृश्य मात्र परिणामकारक कला – ए श्रीकर प्रसाद
प्रत्येक व्यक्तीने आपल्यातील कलात्मकता जोपासण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे – समर सिंग जोधा