पुणे: उपचारासाठी आला अन तावडीत सापडला, मोक्क्यात वर्षभरापासूर फरारी तिघांना अटक

कोंढवा, दि. २४/११/२०२२: मोक्क्याच्या गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार असलेल्या तिघाजणांना कोंढवा पोलिसांनी अटक केली.  रूग्णालयात उपचार घेण्यासाठी संबंधित आरोपी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले. चौकशीत इतर दोघा साथीदारांनाही अटक करण्यात आली.

करण विठ्ठल काळे (२२),  गणेश जयजयकार नाडे (२०), दोघेही रा. पद्मावती वसाहत, शेळकेवस्ती, बिबवेवाडी चंदू गायकवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपींचा कोंढवा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी सराईत चंदू गायकवाड उपचार घेण्यासाठी रूग्णालयात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमोल हिरवे, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिंचकर मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने  दोघे साथीदार शेळके वस्ती परिसरात लपून राहत असल्याची माहिती दिली. त्यानुसार दोघांना अटक करण्यात आली.

ही कामगिरी एसीपी  पोर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक  संजय मोगले, एपीआय अनिल सुरवसे, अमोल हिरवे, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, जयदेव भोसले, मरगळे, राहुल रासगे, दिपक जडे, महेश राठोड यांनी केली.