पुणे: जागा बळकावून, ताबा सोडण्यासाठी ९१ लाखांची खंडणी मागणाऱ्यास अटक

पुणे, २५ जून २०२१: – तक्रारदाराच्या कोंढव्यातील जागेवर ताबा मारून सेटलमेंटसाठी तब्बल ९१ लाखांची खंडणी मागणाऱ्या पापा इनामदार टोळीतील एकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली. मुसा कमरूद्दीन इनामदार (वय ४०, रा. कोंढवा बुद्रूक ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार आणि त्यांच्या मित्राची कोंढवा परिसरात ९१ गुंठे जागा आहे. संबधित जागेवर पापा नबी इनामदार, मुसा कमरुद्दीन इनामदार, रूपचंद भिमाजी गजरे, रफिक इनामदार, अयाज अब्दुल रेहमान शेख सर्व (रा. कोंढवा) यांनी ताबा मारला होता.

टोळीने संबंधित जागेवरील ताबा सोडण्यासाठी प्रतीगुंठा एक लाख रूपये मिळून ९१ लाखांची खंडणी तक्रारदाराकडे मागितली होती. त्यानुसार तक्रारदाराने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर पथकाने आरोपी मुसा इनामदार याला अटक केली आहे. त्याचे साथीदार आणि मुख्य सुत्रधाराचा शोध घेतला जात आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, संपत अवचरे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शैलेश सुर्वे, राहूल उत्तरकर, विनोद साळुंके,संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, अमोल पिलाणे, भूषण शेलार, प्रदीप गाडे, मोहन येलपल्ले, प्रवीण पडवळ, चेतन शिरोळकर, रूपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.