पुणे, २७/०८/२०२१: कोविड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना चाकण ग्रामीण रुग्णालयात मदतनीस म्हणून काम करणाNयाला एसीबीने रंगेहात पकडले आहे. सचिन अरून शिंदे (वय ३८) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार, त्यांचे मित्र आणि कुटुंबातील व्यक्तींनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. दुसऱ्या डोसची तारीख जवळ आल्यामुळे त्यांनी चाकण रूग्णालयात चौकशी केली. त्यावेळी रुग्णालयात मदतीन म्हणून काम करणाऱ्या सचिन शिंदे याने लसीचा दुसरा डोस मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे १ हजार ८०० रूपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्याकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी त्याने लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार गुरूवारी लस देण्यासाठी एक हजार रूपयांची लाच घेताना शिंदे याला रंगेहात पकडण्यात आले.
More Stories
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड’ च्या अध्यक्षपदी अमोल कागवडे ; पदग्रहण समारंभ संपन्न
मिळकतींची माहिती देताना लपवाछपवी
पुणे: डेक्कनमधील सराईत वर्षभरासाठी तडीपार