पुणे:निर्बंध नसल्याने भिमाकोरेगांव शौर्यदिन मोठया उत्साहात साजरा होणार, २० लाख भीम अनुयांयासाठी नियोजन सुरू

पुणे, २२/११/२०२२: दरवर्षी प्रमाणे भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमाचे ०१ जानेवारी २०२३ रोजी मौजे पेरणे येथील विजयस्तंभाजवळ मोठयाप्रमाणात आयोजन करण्यात आलेले आहे. भिमाकोरेगांव हल्ला त्यानंतरची तणावाची परिस्थिती व पुन्हा त्यानंतर कोविड प्रतिबंधक नियमांचे दोन वर्षे यामुळे यंदाच्या वर्षी तब्बल ५ वर्षानंतर लक्षावधी भीम अनुयायी शौर्य उत्सवाहात सहभागी होणार आहेत. तब्बल लाख भीम अनुयायी अभिवादनासाठी २० दाखल होण्याची शक्यता गृहित धरून राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाचे आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समिती तसेच भिमाकोरेगांव विजयस्तंभ शौय दिन समन्वय समिती व अन्य पक्ष संघटनाच्या प्रतिनिधींच्यावतीने यंदाचा उत्सव निर्बंध नसल्याने मोठया प्रमाणात साजरा करणेबाबत नियोजन सुरू केले आहे. अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डबाळे यांनी दिली.

भिमाकोरेगांव विजयस्तभ शौर्य दिनाच्या कार्यक्रमाबद्दल प्रशासनाने जय्यत तयारी केली असून येणाऱ्या अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याबाबत कसोशिने प्रयत्न करण्यात येत आहे. मुबलक पार्किंग व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, अनुयायासाठी मंडपाची व्यवस्था, विजयस्तंभाचे फुलांची आरास करून सुशोभिकरण इत्यादी बाबीचा यामध्ये समावेश आहे. नियोजनाच्या अनुषंगाने भीम अनुयायी तसेच आंबेडकरी पक्ष संघटनानचे प्रतिनिधी व समाजकल्याण, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पी. एम.पी.एल. यासह तब्बल २१ विभाग प्रमुखांच्या सातत्याने बैठका होत आहेत.

मागील वर्षी प्रमाणेच शौर्य दिन आयोजनाचा संपुर्ण खर्च बार्टी या शासकीय संस्थेमार्फतच करण्यात येणार असून त्यांच्याकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. सोबतच वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर, रिपाईचे रामदासजी आठवले, पी. आर. पी. चे प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बामसेफचे वामन मेश्राम, भारतीय दलित कोब्राचे विवेक चव्हाण, यांसह अर्जुन डांगळे, नाना इंदिसे, मनोज संसारे, इत्यादी आंबेडकरी नेत्याच्या सभा त्यांच्या पक्ष संघटनाच्यावतीने आयोजित करण्यात येणार आहेत.

भिमाकोरेगांव विजयस्तभ शौय दिन समन्वय समिती च्यावतीने येणान्य भीम अनुयायांना आव्हान करण्यात येते की, आपण कोणत्याही अफवांना बळी न पडता यंदाचा शौर्यदिन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने लक्षवधी भीम अनुयांच्या उपस्थित साजरा होणार असून या उत्साहात सहभागी होणाऱ्यांचे पंचक्रोशितील सर्व जाती धर्माच्या लोकांकडून विशेषत: ग्रामपंचायतीकडून स्वागत करण्यात येणार आहे.

दरम्यान शासनाने जाहिर केलेल्या १०० कोटी रूपयाचे विजयस्तभ राष्ट्रीय स्मारकाचे कामकाज देखील सुरूच असून या संदर्भात मा. समाजकल्याण आयुक्त यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या असून ७ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरातील आंबेडकरी पक्ष संघटनेच्या प्रतिनिधीशी संयुक्त बैठक घेवून स्मारका विषयी आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे.