पुण्यात 2015-20 या काळात 9,600 कोटी रुपयांची गुंतवणूक, परदेशी गुंतवणूकदारांपैकी 77 टक्के वाटा

पुणे, 14 जून 2021 – जेएलएलने “रीअल इस्टेट इन पोस्ट पँडेमिक पुणे-अपॉर्च्युनिटी इन द मेकिंग ” हा खास पुणे शहराविषयीचा अहवाल सादर केला आहे. 2015 ते 20 या काळात पुणे शहराने 9600 कोटींची संस्थात्मक गुंतवणूक आकर्षित केल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, दमदार मागणी, स्थिर भाडे आणि कार्यालये रिकामी राहण्याचे 5 टक्के इतके कमी प्रमाण यामुळे संस्थात्मक गुंतवणुकीत कार्यालयीन मालमत्तांचा 49 टक्के असा अधिक वाटा आहे. तर, निवासी क्षेत्राने गुंतवणुकीत 25 टक्के वाटा मिळवला आहे.

2021 च्या पहिल्या तिमाहीत गुंतवणुकीच्या विचाराने जोर धरला मात्र त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे व्यवहारांमध्ये अडथळे आले. 2015 ते 20 या काळात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, विशेषत: खासगी इक्विटी फंडांनी एकूण गुंतवणुकीतील 77 टक्के वाट्यासह व्यवहारांमधील मोठा वाटा मिळवला. आघाडीच्या फंडांनी REITsच्या माध्यमातून पोर्टफोलिओ बनवण्याच्या दृष्टीने कार्यालयीन जागा संपादित केल्या. दरम्यान, ग्लोबल फंड्सचे व्यवहार थेट कार्यालयीन मालमत्ता विकत घेण्यासाठीचे केले गेले.

“नियोजित मेट्रो नेटवर्क आणि रिंग रोड यामुळे पुण्याच्या शहरी पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड बदल होणार आहेत. पुढील 24 महिन्यांमध्ये शहरातील मेट्रो नेटवर्क सुरू होईल, असा अंदाज आहे. पुणे शहराला दोन रिंग रोड्स लाभणार आहेत. यातील एक पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-PMRDA) अंतर्गत येतो आणि हा मार्ग 65 मीटर्स रुंद असेल. दुसरा 110 मीटर्स रुंद रिंग रोड महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ – MSRDC) अंतर्गत येतो. आतल्या रिंग रोडच्या आधी बाहेरचा रिंग रोड पूर्ण होईल. शिवाय, बाहेरच्या रिंग रोडवर पुरंदर येथे नवे तीन स्ट्रिप ग्रीनफिल्ड एअरपोर्ट उभारले जाईल, अशी आशा आम्हाला वाटते. यासाठी 4000 एकरांचे भसंपादन सुरू आहे. या विमानतळावर एक कार्गो आणि तीन पॅसेंजर स्ट्रिप असतील. पनवेल किंवा मुंबई विमानतळाहून हे विमानतळ भव्य असेल. पनवेल विमानतळामुळेही पुण्याच्या विकासगाथेत भर पडणार आहे. इतकेच नाही, शहरातील प्रतिभा, तंत्रज्ञान, उद्योगक्षेत्रे आणि कनेक्टिव्हिटीमुळे हे शहर भारतातील नवी मेगासिटी बनण्याकडे वाटचाल करेल. रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ होत आहे आणि सातत्याने दर्जेदार मालमत्ता उभ्या राहत आहेत. त्यामुळे जगभरातील प्रत्यक्ष जागा वापरणारे, विकासक आणि गुंतवणूकदारांना या शहरात प्रचंड संधी उपलब्ध होतील,” असे जेएलएल इंडियाच्या लॉजिस्टिक्स अॅण्ड इंडस्ट्रिअल विभागाचे पुण्यातील व्यवस्थापकीय संचालक संजय बजाज म्हणाले.

“गुंतवणूकदारांना ग्रेड ए कार्यालय आणि औद्योगिक मालमत्ता या दोहोंमध्ये रुची आहे. कारण या दोन्ही प्रकारात दमदार वैशिष्ट्ये आहेत आणि यातून दीर्घकालीन स्थिर परतावा मिळू शकतो. शहरातील संबंधित मायक्रो- मार्केट्समध्ये कार्यालये आणि औद्योगिक मालमत्तांवर भर देणाऱ्या फंडांचे उच्च मूल्याचे व्यवहार होण्याची शक्यता असते. 2021 मध्ये नवी गुंतवणूक व्यासपीठेही स्थापन होण्याची चिन्हे आहेत,” असे ते पुढे म्हणाले.

“आयटी/आयटीईएस, बीएफएसआय, फिनटेक, आरअॅण्डडी आणि उत्पादन अशा क्षेत्रांचा अधिक भरणा असलेले पुणे शहर एक बाजारपेठ म्हणून वेगाने वाढले. 2018-19 मध्ये सर्वाधिक म्हणजे 6.4 ते 6.5 दशलक्ष चौ. फुट अशा आकडेवारीसह पुण्यात दरवर्षी 5 दशलक्ष चौ. फुट (2020 चा अपवाद वगळता) जागा भाड्याने दिल्या जातात. ग्रेड ए कार्यालयांसाठीची सातत्यपूर्ण मागणी असल्याने जागा वापरण्याचे प्रमाण वाढले आणि रिकाम्या जागांचे प्रमाण 2010 मधील 15 टक्क्यांवरून 2020 मध्ये 5 टक्क्यांवर आले. याच काळात भाड्याच्या व्यवहारांमध्येही बरीच वाढ झाली. मोठ्या जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या क्षमता ओळखून पुण्याच्या कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेत ठळक उपस्थिती नोंदवली. शिवाय, या संस्थात्मक मालकांची उपस्थिती वाढेल असा अंदाज आहे आणि कार्यालयीन बाजारपेठ म्हणून पुण्याचे हे एक लक्षणीय वैशिष्ट्य ठरणार आहे. त्याचप्रमाणे, प्रदीर्घ काळ एचएनआय मागणीही लक्षणीय होती आणि त्यातून मूळ मालमत्ता विक्री आणि जागा वापरणाऱ्यांच्या गरजांप्रमाणे बांधलेल्या दर्जेदार वैशिष्ट्यपूर्ण मालमत्तांची विक्री यांच्यात वाढ झाली,” असे जेएलएल इंडियाच्या रीसर्च अॅण्ड आरईआयएसचे प्रमुख आणि चीफ इकोनॉमिस्ट समंतक दास म्हणाले.

पुण्यात 31 दशलक्ष चौ. फुट REIT क्षम कार्यालयीन जागा

कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेत दोन लिस्टेड REITचा लक्षणीय वाटा असल्याने शहरातील REITक्षम कार्यालयीन मालमत्तांमधील क्षमता अधोरेखित होतात. रिस्क मिटिगेशन धोरणे आणि REIT ही सर्व शहरांमध्ये आणि सर्व प्रकारच्या मालमत्तांच्या संदर्भात महत्त्वाची ठरतात. जेएलएलच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे की REITसाठी 31 दशलक्ष चौ. फुट कार्यालयीन जागा पात्र ठरतील. REITक्षम जागांमध्ये सर्व प्रकारच्या फक्त भाडेतत्वावरील जागा ज्या 2,00

Pune Attracted Institutional Investments Worth Rs 9,600 Crore During 2015-20