पुणे ऑटो एक्स्पो २२ डिसेंबर पासून

पुणे, १९/१२/२०२२: पश्चिम भारतातील सर्वात मोठे ऑटोमोटिव्ह प्रदर्शन – पुणे ऑटो एक्स्पो (वाहन उद्योग प्रदर्शन ) २२ – २६ डिसेंबर २०२२ दरम्यान क्रिएटी सिटी कॅम्पस येरवडा पुणे येथे भरणार आहे. कार्बन उत्सर्जन आणि शाश्वत वाहतूकीसाठी उपलब्ध पर्याय (“शाश्वत इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि इकोसिस्टम” ) वाहन उद्योग क्षेत्रातील तांत्रिक घडामोडी व विकास – आजची व भविष्यकाळातील इलेक्ट्रिक वाहने, सुरक्षित व प्रदूषणमुक्त वाहने, या विषयाचे महत्व लक्षात घेऊन २०वे ऑटो एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ऑटो एक्स्पोचे उद्घाटन गुरुवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सदर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ ले.जन.मंजीत कुमार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होणार आहे. या वेळी पी.एम कुरुलकर ( रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेन्ट इंजिनिअर्स संचालक) डॉ. संजय कोलते(सीईओ, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन),श्रीमती प्रज्ञा पोतदार, (सहव्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ)श्री. अतुल मुळे, (अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड) महेश (क्रिएटी सिटी कॅम्पस) हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

देशातील नामवंत उत्पादक, त्यांचे प्रतिनिधि आणि विक्रेते, व्यापारी, सर्विस इंजिनिअर्स, मेकॅनिक्स , गॅरेज मालक अणि संबंधित व्यावसायिक या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

पुणे ऑटो एक्स्पो मधील प्रदर्शनात कार, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, चार्जिंग आणि पायाभूत सुविधा, दुचाकी आणि तीन चाकी वाहने, ऑटो घटक आणि सुटे, जैव इंधन, ऑटोमोटिव्ह चाचणी, सेवा उपकरणे आणि साधने, संशोधन आणि विकास आणि ऑटो अॅक्सेसरीजचा समावेश आहे. लष्करी वाहन विभागात क्षेपणास्त्र लाँचर्स,(मिसाईल्स) रणगाडे आणि त्याचे भाग, पाळत ठेवणारी यंत्रणा, रिमोट ऑपरेटेड व्हेईकल इत्यादी प्रदर्शित होणार आहेत.

भाऊ इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला नॉव्हेल स्टार्ट-अप पॅव्हेलियन तरुण आणि आगामी उद्योजकांना मार्गदर्शन करेल. या विभागात काही नवीन आणि नाविन्यपूर्ण कल्पना आणि उत्पादने प्रदर्शित केली जातील.

स्टुडंट्स पॅव्हेलियन मधे भारतात आयोजित बाजा, सुप्रा, गो-कार्ट आणि इफिसायकल स्पर्धांचा भाग असलेल्या कन्सेप्ट वाहनांचे प्रोजेक्ट डिस्प्ले असेल. पुणे आणि पीसीएमसी परिसरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांद्वारे तांत्रिक नवकल्पनांसह इको वाहनांना चालना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट आणि पुणे सिटी ट्रान्सपोर्टमधील प्रत्येकी दोन वाहन चालकांना “सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर अवॉर्ड देण्यात येणार आहेत.

पुणे ऑटो एक्सपो च्या वेळी पुढील विषयांवर परिषदा व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि.२३/१२/२०२२ ई वी. सिम्पोजियम – भारतातील ई को सिस्टीम बाबत विकास व सस्टेनेबल इलेक्ट्रिक मोबिलीटी – तज्ञ घटक, डिझाइन, मॉडेलिंग, ई व्ही. चे विविध पैलू , डिझाइन, नियंत्रण आणि चाचण्या.शनिवार दि.२४/१२/२०२२ ;टेक्नोलॉजि कॉन्फरन्स डे -उद्योगातील आव्हाने ,तज्ञ भारतातील ईव्ही इकोसिस्टमला चालना. ईव्ही चाचणीचे भविष्य बॅटरी स्वॅपिंगमधील ट्रेंड,तांत्रिक विषयांमध्ये, ड्राईव्ह ट्रेनचे नुकसान कमी करणे, बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगती बीऐसएम आणि अनुप्रयोगांची आवश्यकता यासंबधितांचे मार्गदर्शन -आय ईईई पुणे , इन्स्टिट्यूट ऑफ़ इंजीनियर, , टीचर फोरम.रविवार दि.२५/१२/२०२२ मैनेजमेंट डे परिषद – रस्ते सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषद. मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन (MDSOA) महाराष्ट्र वेबसाईटचे उद्घाटन व सुरक्षा तज्ञांचा सन्मान.