पुणे: चतुःशृंगी ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बालाजी पांढरे, आयुक्तालयातंर्गत पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे, दि. ११/१२/२०२२: शहर पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्य वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून संदीपान पवार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुर्वी ते पोलीस आयुक्तांचे वाचक म्हणून कार्यरत होते.

 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अपर पोलीस आयुक्त आर. राजा यांनी बदलीचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गुन्हे शाखा युनीट पाचचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोथरूडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब बडे यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. त्याशिवाय चतुःशृंगी ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांना पुढील आदेशापर्यंत नियंत्रण कक्षात कायम ठेवले आहे.