पुणे, 31/10/2022- शहरातील धायरी परिसरात बेनकर वस्ती ते काळूबाई मंदिर चौक दरम्यान सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ वेळेत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाने हे आदेश काढले आहेत.
धायरीतील बेनकर वस्ती ते काळूबाई मंदिर चौक दरम्यानचा रस्ता गजबजलेला आहे. या भागात जड वाहनांमुळे कोंडीसह अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी भागात सकाळी आठ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री आठ या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घातली आहे.दरम्यान, कोंढवा भागातील सहा रस्त्यांवर सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
जड वाहनांसाठी बंदी घातलेले रस्ते
– येसाजी कामठे चौक ते कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, सोमजी चौकाकडून कोंढवा बुद्रककडे जाणारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील भोलेनाथ मंडळ चौकातून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या कार्यालयाकडून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, टिळेकरनगर चौकातून कोंढवा बुद्रुककडे जाणारा रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता ते व्हीआयटी महाविद्यालय रस्ता परिसरातील शांतीबन सोसायटी परिसर.
More Stories
पुणे विद्यापीठाचे ३० जानेवारीचे पेपर ५ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार
पीएमडीटीए-महाराष्ट्र मंडळ ब्राँझ सिरिज 2023 टेनिस स्पर्धेत नीरज जोर्वेकर, रणवीर गुंड, आयुष कौशल यांचा दुस-या फेरीत प्रवेश
पुणे: दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींनी वापरलेली वाहने जप्त, सामुहिक हत्याकांड प्रकरणात आरोपींची चौकशी सुरू