पुणे: मारहाण झालेल्या तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

पुणे, ०९/११/२०२२: चोरांची अफवा पसरवीत आरडा-ओरड झाल्यामुळे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला अडवून मारहाण करीत 12 हजारांचा मोबाइल हिसकाविण्याची घटना 7 नोव्हेंबरला रात्री तीनच्या सुमारास रामटेकडी परिसरात वंदे मातरम चौकात घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी विनोद विलास कदम (वय 32, रा. रामटेकडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. हॅरी ब्रॅजिमेन बल्लार्ड (वय 39) असे जखमीचे नाव असून याप्रकरणात खुनाचे कलम (भादवि 302) वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादी बल्लार्ड कुटुंबीयासह मगरीनबाई चाळीत राहायला आहेत. 7 नोव्हेंबरला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास परिसरात चोर-चोर असा मोठ्याने आवाज आला. त्यामुळे काही तरी घटना झाली आहे, असे समजून हॅरी घराबाहेर पडले. काही अंतरावर चोरट्यांनी त्याला गाठून बेदम मारहाण केली. त्यांच्याकडील 12 हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकणात आता खुनाचे कलम वाढ करण्यात आले आहे.