पुणे: मुकुंदनगरमध्ये धावत्या दुचाकीला आग, दुचाकीस्वार सुखरुप

पुणे, १९/०७/२०२२: स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथे धावत्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. दुचाकीस्वाराने तत्परता दाखवून दुचाकी रस्त्यात सोडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग भडकल्याने दुचाकी जळून भस्मसात झाली.

मुकुंदनगर येथे सुजय गार्डनसमोरुन दुचाकीस्वार जात होता. त्या वेळी दुचाकीतून अचानक धूर आल्याने दुचाकीस्वाराने दुचाकी रस्त्यात लावली. काही कळायच्या आत दुचाकीने पेट घेतला. दुचाकीस्वार घाबरला. त्यानंतर या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशम दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. दुचाकी पूर्णपणे जळाली असून दुचाकीच्या अंतर्गत भागातील शाॅर्टसर्किट झाल्याने दुचाकीने पेट घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.