पुणे: खेड प्रकरणामुळे महाविकास आघाडीत कटुता, खासदार संजय राऊत यांची टीका

पुणे, ५/०६/२०२१: खेडच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली होती, तरीही शिवसेनेचे सदस्य फोडून आमच्यावर अन्याय केला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असताना खेडच्या प्रकरणामुळे कटुता निर्माण झाली आहे, स्थानिक राजकारण कुठपर्यंत नेण्याचे हे ठरवले पाहिजे, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

शिवसेना भवन येथे खासदार राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खेड पंचायत समिती सभापतीपदाच्या प्रकरणात शिवसेनेवर अन्याय झाला आहे. आमचे सदस्य पळवून नेलेे. हा सर्व प्रकार आमदार दिलीप मोहिते यांनी विषय घडवून आणला. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष पाटील यांना चर्चा करून लक्ष घालण्यास सांगितले, हे सरकार टिकेल पाहिजे, पण जेथे शिवसैनिकांना त्रास दिला जाणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून पुण्यात आलो आहे.

चंद्रकांत पाटील म्हणजे वसंतदादा पाटील नाहीत. शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करणे योग्य नाही. पवारांवर टीका केल्या शिवाय बातम्या होत नाहीत, अशी टीका केली.

राऊत यांचा वडेट्टीवारांना टोला

अनलॉक होतय हे चांगले आहे, लोकांना त्रास होत नाही याची काळजी घेतली. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले पाहिजे. अनलॉक करण्यावरून गोंधळ झाला, पण काही लोकांचा उत्साह असतो त्यामुळे असे होते, असा टोला वडेट्टीवारांना लावला.

आम्ही समोरून वार करतो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी सोबत जाणे चूक होते, पण शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खूपसली असे वक्तव्य केले त्यावर राऊत म्हणावे, भाजपने राष्ट्रवादीसोबत जाणे चूक होते तेव्हा आम्हीही सांगत होतो. संध्याकाळी परत येतील हे देखील सांगितले होते. खंजीर खूपसने महाराष्ट्राासाठी मिळमिळीत शब्द झाले आहेत.

शिवसेना कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही, शिवसेना छातीवर वार करते.