पुणे, १४ ऑगस्ट २०२५ : पुणे भाजप शहर कार्यकारिणी जाहीर करताना पक्षांतर्गत गटबाजी व प्रभावशाली नेत्यांचा दबदबा स्पष्ट झाला आहे. राज्याचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाव ठळकपणे जाणवणाऱ्या या यादीत नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात आपापल्या गटातील कार्यकर्त्यांना प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले. विशेषत: शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत मोहोळ यांची नियुक्ती आणि करण मिसाळ यांची हकालपट्टी यावरून “मिसाळ आऊट, मोहोळ इन” हा संदेश स्पष्ट झाला आहे.
शहराध्यक्षपदी पुनर्नियुक्तीनंतर धीरज घाटे यांनी अखेर २२ सदस्यांची पुणे शहर भाजप कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये मागील कार्यकारिणीतून केवळ दोन पदाधिकाऱ्यांना पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरित बहुतेक नावे गटानुसार ठरल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारिणीत कोथरूड आणि शिवाजीनगर मतदारसंघातील प्रत्येकी एका पदाधिकाऱ्याला स्थान मिळाले असून, हे दोघेही मंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. तर शहर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावर दुष्यंत मोहोळ यांची नियुक्ती झाली. ते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे आहेत. याआधी हे पद राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांचे पुत्र करण मिसाळ यांच्याकडे होते. त्यामुळे मिसाळ गटाला कार्यकारिणीत मोठा धक्का बसला आहे.
पर्वती व कोथरूड भागातील कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे मिळाल्याचे दिसत असून, ही निवडणूकपूर्व कार्यकारिणी गटबाजीतील समतोल राखण्यासाठी आखल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षातल्या इतर गटांकडून या यादीवर नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन कार्यकारिणी:
पुणे शहर सरचिटणीस:
पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, विश्वास ननावरे, प्रियांका शेंडगे
पुणे शहर उपाध्यक्ष:
शशीधर पुरम, सचिन मोरे, अर्जुन जगताप, संदीप दळवी, विठ्ठल बराटे, सुनील पांडे, मनोज खत्री, आनंद रिटे
पुणे शहर चिटणीस:
राजू परदेशी, अनिल नवले, गणेश घुले, समीर रुपदे, अनुराधा एडके, संगीता गवळी, स्मिता खेडेकर, रूपाली धाडवे
पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष:
दुष्यंत मोहोळ
महिला सह मोर्चा अध्यक्ष:
मनीषा लडकत
More Stories
समाविष्ट १६ गावांसाठी ड्रेनेज प्रकल्पाला ३२३ कोटींचा अमृत निधी
पुणेकरांनी गणेशोत्सवात जपले पर्यावरण, साडेसहा लाख गणेशमूर्तीचे विसर्जन
Pune: सायकल स्पर्धेसाठी पुण्यातील रस्त्यांचा मेकओव्हर – १४५ कोटींची तरतूद मंजूर