पुणे: पत्नी व मुलींच्या मारहाणीत समाजसेवकाच्या मेंदुत रक्तस्त्राव

पुणे, ०८/१२/२०२२: पत्नी आणि सावत्र मुलींनी केलेल्या मारहाणीत ए  समाजसेवकाच्या मेंदुत रक्तस्त्राव झाला. त्याने दिलेल्या तक्रारीनूसार चंदननगर पोलीस ठाण्यात तीघींविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी सतीश श्रीधर जाधव( 51,रा.मल्हारनगर, वडगाव शेरी) यांची शामल ही पत्नी असून तीला पहिल्या पतीपासून एक 38 आणि एक 34 वर्षाची मुलगी आहे. या दोघीही सतीश यांच्या सोबत रहातात. या तीघींनी घटनेच्या दिवशी स्वयंपाक न करता बाहेरुन आईस्कीम आणले होते. त्यांना सतिश यांनी मी चार चपात्या खाणारा माणूस माझे आईस्रकीमने पोट भरणार नाही असे म्हणाले.
 यानंतर त्यांनी टीपॉयवर ठेवलेले आईस्क्रीम फेकून दिले. याचा राग येऊन तीघींनी त्यांचे डोके भिंतीवर आपटून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. दोन दिवसांनी सतीश यांना डोके दुखू लागल्याने तसेच उलट्या होत असल्याने ते हॉस्पिटलमध्ये गेले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मेंदुमध्ये अतिरीक्त रक्तस्त्राव झाल्याचे सांगितले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.