पुणे, १२ मे २०२५: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजश्री शाहू महाराज शाळेजवळील गणपती मंदिर परिसरात सोमवारी एका ४८ वर्षीय पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ट पोलीस निरीक्षक माया देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला असून त्याच्या तोंडातून फेस येत होता. प्राथमिक तपासात त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पुढील तपासात मृत इसमाची ओळख लक्ष्मण माधवराव गायकवाड (वय ४८, व्यवसाय पेंटर, सध्या राहणार – जाधव वस्ती, मुंढवा) अशी पटली आहे.
पोलिसांनी गायकवाड यांचा मुलगा संजय लक्ष्मण गायकवाड (वय २२) यांच्याशी संपर्क साधला असून, मृत इसमाला तातडीने ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास मुंढवा पोलीस करत आहेत.

More Stories
Pune: तबलावादन आणि गायनाने युवा तालचक्र महोत्सवाला सुरुवात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इंडियाज रोडमॅप टू ग्लोबल लीडरशीप इन ॲडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग’ चे प्रकाशन
‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’च्या बोधचिन्हाचे आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण