तळेगाव दाभाडे मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी इमारत भाडयाने पाहिजे

पुणे, १४/७ /२०२१ :- मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तळेगाव दाभाडे ता. मावळ जिल्हा पुणे. या संस्थेला खाजगी इमारत सर्व सोयीने युक्त अशी इमारत भाडयाने हवी आहे. इमारत ही 5000 ते 5500 चौ. फूट इतक्या क्षेत्रफळाची पाहिजे असून त्यामध्ये किमान 20 ते 25 खोल्या, 10 संडास, 10 बाथरूम, लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय, पाणी साठवणूकीची सोय, तसेच इमारतीभोवती संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे.


वसतिगृहात मागासवर्गीय मुलींना इ. 8 वी ते पदवीपर्यंतच्या वर्गांना मोफत प्रवेश दिला जातो. सर्व सोयीसुविधा मोफत देण्यात येतात. तरी तळेगाव व वडगाव मावळ या भागातील इच्छूक इमारत मालकांनी पुढील पत्तावर संपर्क साधावा. संपर्काचा पत्ता- सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, पुणे जिल्हा, पुणे-020-29706611. व गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तळेगाव दाभाडे ता. मावळ जिल्हा पुणे. मो नं 9561568459 यावर संपर्क करावा, असेही तळेगाव दाभाडे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षकांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.