पुणे: माजी पोलीस महासंचालकांच्या घरात चोरी करणाऱ्यांना अटक

पुणे, १५ जून २०२१: – माजी पोलिस महासंचालकांच्या घरासह इतर दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल १ कोटी ३४ लाखांचा ऐवज चोरून नेणाऱ्यांना कोंढवा पोलिसांनी हरियाणातून अटक केली. चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफालाही अटक करण्यात आली आहे. राजेशकुमार मोहनलाल सरोज, राकेशकुमार मोहनलाल सरोज आणि सराफ मदनलाल मोहनलाल कुम्हार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

उंड्री परिसरात राहणारे माजी पोलीस महासंचालक राज खिलनानी यांच्या घरासह दोन घरांमध्ये चोरट्यांनी चोरी करून १ कोटी ३४ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना २३ ते २४ ऑगस्ट २०२० मध्ये घडली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी मनीषकुमारला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत कोंढवा पोलिसांनी विविध राज्यात शोध घेऊन सरोज बंधूसह सराफाला अटक केली आहे.