पुणे: उमेदवारांनो पोलिस भरतीसंदर्भात प्रलोभांना बळी पडू नका- पोलिसांचे आवाहन

पुणे, दि. ३/०१/२०२२ – पुणे शहर पोलिस आस्थापनेवरील पोलिस शिपाई चालक पदाची भरती प्रक्रिया ३ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया पुर्णपणे पारदर्शीपद्धतीने राबविण्यात येत आहे, त्यामुळे भरतीसाठी कोणत्याही भुलथापा आणि प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार आणि सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

पोलिस शिपाई चालक भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन रित्या प्रवेशपत्र देण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी नमूद तारखेला उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. कोणत्याही कारणास्तव उमेदवार नमूद तारखेला उपस्थित न राहिल्यास त्याला पुन्हा संधी दिली जाणार नाही. दरम्याय, पोलीस भरतीसाठी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता, फसवणूक टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबतची काही माहिती असल्यास व्हिजिलन्स अधिकार्‍यांना माहिती द्यावी, अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार ७०२०६९२७९७, पोलीस उपायुक्त आर राजा ९४९०७७६९२८, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल ८२८९००५१३३ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.