पुणे: मोक्याच्या गुन्हयात जामिनावर सुटल्यानंतर केली चोरी, चंदननगर पोलिसांनी आरोपोली दोन दिवसांत ठोकल्या बेड्या

पुणे,०८/०७/२०२१: मोक्याच्या गुन्हयात जामिनावर सुटल्यानंतर घरफोडी करणाऱ्या सराईताला चंदननगर पोलीसांनी अवघ्या दोन दिवसांत बेडया ठोकल्या. अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधाणी (वय ४५, रा. मांजरी बुद्रुक) असे अटक आरोपीचे नाव आहे.

 

चंदननगर पोलीस हददीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी घरफोडी करणारा आरोपी मांजरी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार अमित कांबळे व महेश नाणेकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीचा पाठलाग करुन त्याला शिताफिने पकडले. चौकशीत आरोपी अर्जुनसिंग याच्याकडुन २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक चांदिचे बिस्कीट असा जप्त करण्यात आला.

 

अर्जुनसिंग याचेवर २००३ पासुन पुणे शहर हददीतील वेगवेगळया पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याचेवर तळेगाव ढमढेरे येथे यापुर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सुनिल जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, सहायक फौजदार युसुफ पठाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, महेश नाणेकर, श्रीकांत शेंडे, सचिन कळसाईत,अमित कांबळे, सुभाष आव्हाड, विक्रांत सासवडवर यांनी केली.