पुणे, ०९/११/२०२१: पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशतवाद व घातपात रोखण्याकरिता ऑंटी टेरेरिझम चेकिंग (डमी डेकॉय) संदर्भात लष्कर पोलिसांकडून रंगीत तालीम घेण्यात आली. त्यानुसार संशयास्पद बॅगेला पाहून एका दक्ष नागरिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिक दक्षतेच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.
कॅम्प परिसरात वेलनेस फॉरेव्हर मेडिकलमध्ये आज संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास लष्कर पोलिसांनी दहशतवाद व घातपात रोखण्याकरिता ऑंटी टेरेरिझम चेकिंग (डमी डेकॉय) केली. त्याअनुषंगाने मेडिकलच्या पायरीवर काळ्या रंगाची पिशवी ठेवण्यात आली होती. परिसरात लक्ष केंद्रित करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक आणि कर्मचारी दराडे व कदम साध्या वेशात हजर होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी काही अंतरावर जाऊन संशयित बॅगबाबत कोणी पोलीस स्टेशनला किंवा कंट्रोल रूमला माहिती कळवते याची वाट पाहत होते. त्यावेळी परिसरातील कपडे विक्रेते फरदीन खान यांनी तात्काळ लष्कर पोलीस ठाण्यात फोन करून संशयित बॅग विषयी माहिती दिली.त्यानुसार याबाबत डमी डेकॉयची स्टेशन डायरी नोद करण्यात आली.त्यानंतर पोलिसांनी मेडिकल परिसरात जाऊन नागरीकांना दिलासा देत डमी डेकॉयची रंगीत तालीमची माहिती दिली. घातपात जागृकता तपासण्यासाठी पोलिसांनी बॅग ठेवल्याचे सांगताच नागरिकांनि सुटकेचा निःश्वास टाकला. पोलिसांनी आजूबाजूचे व्यापाऱ्यांना बोलावूनच दहशतवाद व घातपात रोखण्याकरिता अँटी टेररिझम चेकिग बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद