November 5, 2025

पुणे: ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आवाहन

पुणे, दि. ११ जुलै २०२५: राज्य शासनाच्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नागरिक सर्वेक्षणात पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

या सर्वेक्षणाद्वारे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या आकांक्षा, अपेक्षा व सूचना जाणून घेण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे भविष्यातील विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस योजना तयार करणे आणि नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करणे, असे डुडी यांनी सांगितले.

सर्वेक्षणात फक्त ७ सोपे प्रश्न विचारले जात असून नागरिकांना याचे उत्तर पर्याय निवडून देता येते किंवा आपला आवाज ध्वनीमुद्रीत (रेकॉर्ड) करण्याची सोयही उपलब्ध आहे.

नागरिकांनी आपला अभिप्राय १७ जुलै २०२५ पर्यंत खालील लिंकवर नोंदवावा:
🔗 https://wa.link/o93s9m

या लिंकद्वारे आपले अभिप्राय नोंदवून आपल्या ओळखीच्या इतर नागरिकांनाही या सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.