पुणे,२६ जून २०२१: सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणारे नागरीक, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ आस्थापना चालु ठेवणारे दुकानदार, दुकानामध्ये सोशल डिस्टंसिंग न ठेवणारे दुकानदार अशा प्रकारे कोविड- १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांना आता ऑनलाईनही दंड भरता येणार आहे.
मार्च २०२० पासून कोविड १९ महामारीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नागरीकांनी कोविड- १९ संदर्भात दिलेले निर्देश पाळावेत व कोविड- १९ आजाराच्या संसर्ग वाढण्याला प्रतिबंध बसावा यासाठी नियमांचे पालन न करणाऱ्या नागरीकांवर यांना दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत सदर आकारण्यात येणारा दंड हा नियम मोडणारे नागरीक यांचेकडुन रोख स्वरुपात घेण्यात येत होता. परंतु काही लोकांची सुचना होती की, सदर दंड हा ऑनलाईन स्वरुपातही घेण्यात यावा. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे संकल्पनेतून 23 जूनपासून ऑनलाईन दंड घेण्याबाबतची प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, ऑनलाईन पध्दतीने तीन दिवसात २४,०००/- रुपये दंड जमा झाला आहे.
यासाठी एचडीएफसी बँक येथे सदर दंड आकारण्यासाठी वेगळे खाते उघडण्यात आले असून सर्व पोलीस स्टेशन वाहतुक शाखा यांना त्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल फोन, क्युआर कोड, क्यु आर कोड फ्लेक्स, इ. चा पुरवठा करण्यात आलेला आहे. तसेच ऑनलाईन दंड स्विकारणेबाबत सर्व पोलीस स्टेशन कडील डे-बुक व सर्व वाहतुक शाखांकडील डयुटी वाटप करणारे पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
More Stories
बेकायदेशीरपणे हुक्का पार्ट्यांचे आयोजन करणा-या बड्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांकडून कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा तर सुमारे 90 हजाराचा मुद्देमाल जप्त
डिएगो ज्युनियर्सचे अपराजित्व कायम, युपीएसएवर सहज विजय
एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18 वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या अजमीर शेख, रुमा गायकैवारी यांना विजेतेपद